सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन ह्या जागतिक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या मॅथ्स ऑलिम्पियाड स्पर्धेत इचलकरंजी येथील आदित्यराज महेश दरे या विद्यार्थ्याने जगात अव्वल क्रमांक पटकवला आहे. आदित्यराज या परीक्षेत पैैकीच्या पैैकी गुण मिळवून हे यश संपादन केले आहे. जागतिक स्थरावर इचलकरंजीचे नाव त्याने मोठे केले. त्याच्या या उत्कृष्ठ यशाबद्दल सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या समवेत आदित्यराजचा फेटा बांधून सत्कार केला व त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, स्मिता दरे, महेश दरे, शांतिनाथ चौगुले, शेखर शहा उपस्थित होते.