सामाजिक कार्ये

वास्तू २०२२ चे उद्घाटन

आयकॉन स्टील प्रायोजित आणि असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अॅण्ड आर्किटेक्ट, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, क्रेडाई, सिमेंट डीलर वेल्फेअर असोसिएशन, बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स असोसिएशन, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या वतीने के.ए.टी.पी. ग्राउंड, इचलकरंजी येथे 'वास्तू २०२२' प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वास्तू २०२२ चे उद्घाटन आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते संपन्न झाले. इचलकरंजी शहर हे अत्याधुनिक टेक्स्टाइल म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कपरिचित आहे. शहराला एक्सपोर्ट सिटी बनविण्यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे नेहमी प्रयत्नशील आहेत. राज्य शासनाने सुद्धा या वस्त्रोद्योगाला पुढे नेण्यासाठी प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे आवाहन करीत इचलकरंजी शहराचा जटील बनलेला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी 100 शुद्ध पेयजल प्रकल्पासह पंचगंगा प्रदूषण कमी करण्यासाठी नदीची खोली वाढवावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याला प्रशासन व शासन यांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, अप्पर तहसीलदार शरद पाटील, विवेक सावंत, संजय रुग्गे, अनिल मनवाणी, रमेश मर्दा, बळीराम घायतिडक, संदीप जाधव, विकास चंगेडीया, सुधाकर झोले, प्रितीश शहा, विठ्ठल तोडकर, घनश्याम सावलानी, महांतेश कोकलकी, सुहास अकिवाटे, जहीर सौदागर, सय्यद गफारी, अभय पिसे, सचिन बोरा, मुकुद ओझा, राजू पाटील, राजेंद्र खंडेराजुरी, गजानन ढवळे, महेश महाजन, पन्नालाल डाळ्या, कुमार माळी, मयूर शहा उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos