सामाजिक कार्ये

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने मदत पुरवावी, अशी मागणी यावेळी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने मदत पुरवावी, अशी मागणी यावेळी केली. यावेळी सर्व नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिक यांचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासह छोट्या उद्योगांना जिल्हा उद्योग केंद्राकडून करून त्यांना ५० हजार रुपये तातडीची मदत म्हणून द्यावेत. ज्या नागरिकांची घरे पूरामुळे पूर्णत: पडली आहेत त्यांना पूर्वीच्या निकषाप्रमाणे ९५ हजार रुपये तर अंशतः पडलेल्या घरांना ६ हजार रुपये दिले जातात. त्याऐवजी यावर्षी निकष बदलून पूर्ण पडलेल्या घरांसाठी केंद्र सरकारचा पंतप्रधान आवास योजनेचे २ लाख ७३ हजार रुपये व राज्य शासनाचे २ लाख ७३ हजार रुपये असे एकत्रित अनुदान देऊन त्यांना घर बांधणीसाठी सहकार्य करण्यासह अंशतः पडलेल्या घरांसाठी पडझडीमुळे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीचे प्रमाणात शासनाने मदत करावी. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेत असलेली साईड मार्जिनची अट रद्द करावी, अशा अनेक मागण्या यावेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केल्या. त्यानंतर या सर्व संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले.

Activity Photos

Activity Videos