सामाजिक कार्ये

लाभार्थ्यांना मंजूरपत्राचे आणि पोस्टामार्फत पेन्शनचे वाटप

इचलकरंजी शहर शाखेअंतर्गत संजयगांधी योजना, #श्रावणबाळयोजना व इंदिरागांधी विधवा व वृध्दापकाळ योजनेतील लाभार्थ्यांना मंजूरपत्राचे आणि पोस्टामार्फत #पेन्शनचे वाटप कार्यक्रम श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे संपन्न झाला. कोरोनाच्या काळात सर्वच गोष्टींबर निर्बंध आल्याने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची चांगलीच परवड झाली. त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे पाहून या लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन देण्याची संकल्पना मांडली आणि पोस्टामार्फत ही योजना अंमलात आणली. त्या अनुषंगाने 7200 लाभार्थ्यांनी खाती उघडण्यात आली असून उर्वरीत 21 हजार लाभार्थ्यांसाठी लवकरच गोविंदराव हायस्कूल येथे कॅम्प घेऊन त्यांची पोस्टात खाती उघडण्यात येतील. मागील 28 जून 2019 ते जून 2022 अखेर संगांयो अंतर्गत विविध योजनेतील नवीन 5600 लाभार्थ्यांचे तब्बल 7 कोटी 82 लाख रुपये प्रलंबित आहेत. जर मागील कमिटीने काम केले असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात अनुदान प्रलंबित कसे राहिले असा सवाल करत 7.82 कोटीचे प्रलंबित अनुदान आपण दिवाळीपूर्वी मिळवून देऊन या लाभार्थ्यांची दिवाळी गोड करु, अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर तहसिलदार शरद पाटील, ताराराणी पक्षाचे प्रकाश दत्तवाडे, पोस्ट ऑफिसर दत्तात्रय मस्कर, पुरवठा निरिक्षण अधिकारी अमित डोंगरे, शिला चिखलीकर, रेखा कांबळे, मोहसीन कंकणवाडी, कल्पना खाडे, कोंडीबा दवडते, राजू बोंद्रे, अनिल शिकलगार, सचिन हेरवाडे, रमेश पाटील, संजय केंगार, सुखदेव माळकरी, रंगराव लाखे, वसंत येटाळे, मंगल सुर्वे, शोभा भाट, रोहिणी पोळ, विद्या सुतार, सावित्री कुंभार आदींसह संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos