सामाजिक कार्ये

ब्रेक टेस्ट ट्रॅक चे उद्घाटन निमंत्रण

6 फेब्रुवारी २०२० रोजी कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क तारदाळ येथील निर्माण करण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅक चे उद्घाटन मा.परिवहन मंत्री ना.अनिल परब यांच्या हस्ते व्हावे यासाठी निमंत्रण दिले . कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १२ लाखांपेक्षा जास्त वाहने आहेत. त्यापैकी सुमारे ४ लाख वाहने हातकणंगले व व शिरोळ या दोन तालुक्यांमध्ये आहेत त्यापैकी अंदाजे २० हजार वाहने ही परिवहन वाहने आहेत. या वाहणांपैकी ९० टक्के वाहने ही रिक्षा, लहान टेम्पो, तीन चाकी टेम्पो प्रकारातील आहेत. या सर्व वाहनांच्या पासिंग साठी इचलकरंजी शहर व परिसरात ट्रॅक उपलब्ध नसल्याने सर्वांना कोल्हापूर येथील आर.टी.ओ कार्यालयात जावे लागते. पासिंग ट्रॅक हा कोल्हापूर शहराबाहेर म्हणजेच मोरेवाडी येथे असल्याने त्याठिकाणी जाऊन पासिंग करावे लागते पासिंग वेळी वाहनांमध्ये दोष आढळल्यास तो पूर्ण दिवस वाया जातो. शिवाय रिक्षा व टेम्पो चालकांचे जवळपास दोन ते तीन दिवस वाया जातात. त्यामुळे पासिंग ट्रॅकची गरज ओळखून तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को - ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क लि. या सहकारी संस्थेच्या जागेत परिवहन विभागाच्या नियम व निकषानुसार ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार केला . हा ब्रेक टेस्ट ट्रॅक संस्थेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे हस्तांतर करण्यात येत आहे.

Activity Photos

Activity Videos