सामाजिक कार्ये

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील ताराराणी सभागृहामध्ये पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी खालील मुद्द्यांवर चर्चा केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील ताराराणी सभागृहामध्ये पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी खालील मुद्द्यांवर चर्चा केली. १. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, व व्यवस्थापनासाठी निधी मिळावा अशी मागणी केली. तसेच रुग्णालयातील ४२ कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व रिक्त असलेल्या पदांवर कर्मचारी निर्णय घेऊन लवकरच त्यांना नियुक्त करण्यात यावे. २. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय हे शासकीय रूग्णालय असून कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे (सी.पी.आर.) हॉस्पिटल नंतर जिल्ह्यातील सर्वात मोठे व प्रशस्त रूग्णालय आहे. सी.पी.आर. हॉस्पिटल हे जिल्हा रूग्णालय होते. परंतु, तेथे मेडिकल कॉलेज सुरू झाले असलेने त्या रूग्णालयाचा जिल्हा रूग्णालयाचा दर्जा आपोआप रद्द झाला आहे. त्यामुळे इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयास जिल्हा रूग्णालय म्हणून दर्जा देणेबाबत सहकार्य करावे. तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय ३०० बेडचे करून तेथे मेडीकल कॉलेज सुरू करणेस मान्यता देण्यात यावी. ३. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे दि.३० जून, २०१६ रोजी शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे या रूग्णालयास देखभाल दुरुस्ती व आवर्ती खर्चासाठी प्रतिवर्षी ११ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, ही रक्कम अजूनही प्राप्त झाली नाही. प्रतीवर्षी रूपये ११ कोटी प्रमाणे गेल्या पाच वर्षांची एकत्रित प्रलंबित रक्कम रूपये ५५ कोटी त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावी. ४. आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे प्रलंबित मानधन देखील लवकरात लवकर मिळावे 5. आमदारांचा स्थानिक विकास निधी-२०२१-२२ मधून अतिरिक्त ३ कोटी रूपये कोरोना प्रतिबंधक लसिकरणासाठी माझ्या स्थानिक विकास निधीतून मिळावा. यावेळी जिल्यातील सर्व मंत्री,खासदार,आमदार यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos