सामाजिक कार्ये

इचलकरंजी शहरातील वाढती रुग्ण संख्या व मृत्युदर पाहता इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय ३०० बेडचे करण्यासह सिटीस्कॅन मशीन व आवश्यक स्टाफ तातडीने भरून घेण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे

इचलकरंजी शहरातील वाढती रुग्ण संख्या व मृत्युदर पाहता इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय ३०० बेडचे करण्यासह सिटीस्कॅन मशीन व आवश्यक स्टाफ तातडीने भरून घेण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रिफ यांनी, आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने भरुन घेऊन जिल्हा नियोजनमधून सीटीस्कॅन मशीन बसवण्यासाठी प्रस्ताव देवून, 15 दिवसात त्याच्या पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी प्रलंबित ४२ कर्मचारी भरती प्रकरणी पाठपुरावा करुन तो प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही ना. मुश्रीफ यांनी सांगितले. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाबाबतच्या सुविधा आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी रुग्णालयात बैठक घेतली. बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अपर तहसीलदार शरद पाटील, तहसीलदार प्रदीप उबाळे, गट विकास अधिकारी शबाना मोकाशी, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे आरोग्य सभापती संजय केगार नगरसेवक सुनील पाटील, अहमद मुजावर, राहुल घाट,कपील शेटके, अनिकेत चव्हाण इचलकरंजी शहरातील नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos