सामाजिक कार्ये

मोटार मॅन्युफॅक्चुरिंग साठी लागणारी अद्ययावत मशिन लॅब डि.के.टी.ई.येथे सुरु करणेचे आश्वासन श्री.राजु केटकाळे यांनी दिले.

२६ डिसेंबर २०१९ रोजी इचलकरंजी-कबनुरचे सुपुत्र व टोयोटा-किर्लोस्कर मोटर्स (भारत) चे सिनियर व्हा.प्रेसिडेंट व डायरेक्टर मा.श्री.राजु केटकाळे यांनी सहपरिवार आमच्या डी.के.टी.ई.काॅलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांना संबोधित केले. तसेच मेकॅनिकल इंजिनिअर विभागासाठी टोयोटा व डि.के.टी.ई. यांच्या संयुक्त विद्यमाने मोटार मॅन्युफॅक्चुरिंग साठी लागणारी अद्ययावत मशिन लॅब डि.के.टी.ई.येथे सुरु करणेचे आश्वासन दिले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.कल्लाप्पांण्णा आवाडे दादा, सेक्रेटरी सौ.सपना आवाडे, स्वप्निलआवाडे तसेच डि.के.टी.ई.चे प्रिंसीपल कडोले सर व इतर ट्रस्टी व स्टाप हजर होते.

Activity Photos

Activity Videos