सामाजिक कार्ये

राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, कोल्हापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतलेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनास सक्रिय पाठींबा दिला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, कोल्हापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतलेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनास सक्रिय पाठींबा दिला. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने पुकारलेल्या या आंदोलनाचे दुसरे पर्व कोल्हापूर येथून प्रारंभित झाले. मराठा समाज हा कुणाही जाती, धर्माच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तर तो स्वतःच्या हक्काची लढाई लढत आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका( रिव्ह्यू पीटिशन) दाखल करावी, सारथी' संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत व त्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 'सारथी' संस्थेची उपकेंद्रे सुरू करावीत.प्रत्येक जिल्हयात सारथी उपकेंद्र सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत, आण्णासाहेब पाटील महामंडळ मार्फत व्याज परताव्याची १० लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान २५ लाख रूपये करावी. मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतीगृहांची उभारणी करावी, या व इतर अनेक मागण्यांसाठी हे मूक आंदोलन महाराष्ट्रभर होणार आहे. विधिमंडळ अधिवेशनात एकमुखी ठराव करून, सर्वांनी एकत्र मराठा आरक्षणाचा विषय मांडू, असे आवाहन केले. मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या या मूक आंदोलनास आपण सर्वांनी एकत्र येऊन पाठींबा देणे, ही आपली जबाबदारी आहे. यावेळी छत्रपती शाहू महाराज, खासदार युवराज छ.संभाजी राजे, मा. प्रकाश आंबडेकर , मालोजीराजे छत्रपती यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मंत्री ,आमदार, खासदार व मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते. #मराठाक्रांतीमूकआंदोलन #कोल्हापूर #एकमराठालाखमराठा #ekmarathalakhmaratha #मराठा_आरक्षण

Activity Photos

Activity Videos