सामाजिक कार्ये

ग्रामीण भागातील शेतक-यांचा आवडत्या #बैल गाडी #शर्यंत या खेळाकडे गांभीर्याने लक्ष देवून बैलगाडी शर्यती चालू कराव्यात व बैलास जंगली प्राण्यांच्या वर्गीकरणातून मुक्त करावे. या मागणीचे निवेदन हातकणंगले तालुक्यातील सर्व #शेतकरी व #बैलगाडी, मालक, चालक यांच्या वतीने हातकणंगले तहसिलदार कार्यालयासमोर भव्य असा बैलगाडी मोर्चा काढून तहसिलदार प्रदिप उबाळे यांना निवेदन दिले.

ग्रामीण भागातील शेतक-यांचा आवडत्या #बैल गाडी #शर्यंत या खेळाकडे गांभीर्याने लक्ष देवून बैलगाडी शर्यती चालू कराव्यात व बैलास जंगली प्राण्यांच्या वर्गीकरणातून मुक्त करावे. या मागणीचे निवेदन हातकणंगले तालुक्यातील सर्व #शेतकरी व #बैलगाडी, मालक, चालक यांच्या वतीने हातकणंगले तहसिलदार कार्यालयासमोर भव्य असा बैलगाडी मोर्चा काढून तहसिलदार प्रदिप उबाळे यांना निवेदन दिले. ग्रामीण भागातील कष्टकरी शेतक-यांचा आवडता प्राणी म्हणजे "बैल”. वर्षभर शेतामध्ये बैलाच्या मदतीने शेतकरी मशागती करतो व त्याला पोटच्या मुलाला जसे सांभाळतात तसे सांभाळतो व त्यामधून त्याला समाधान लाभते. जसे छ. शिवाजी महाराजांनी घोड्यावर स्वार होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, जसे कोल्हापूरचे दैवत #जोतिबा, #नाईकबा तसेच अनेक देवदेवतांचे वाहन म्हणून बैलाकडे पहिले जाते. महादेवाचे वाहन नंदी म्हणजे बैल हे आहे. महादेवाच्या मंदिरात जातानाही ३६ कोटी देव ज्याच्या पोटात आहेत, असे आपण मानतो अशा नंदी (बैल) चे दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश घेतो. बैलाला सर्व धार्मिक, सामाजिक तसेच आत्मिक स्तरावर खूप महत्वाचे मानले जाते. परंतु बैलाचे वर्गीकरण जंगली प्राणामध्ये केले आहे. आणि बैलाच्या #शर्यती वर बंदी घालण्यात आली. हे चुकीचे आहे, त्यामुळे बैलाच्या शर्यती चालू करून घेऊन दिवाळी पर्यंत आम्ही शर्यती वाजत गाजत घेऊ, हे निश्चित आहे.

Activity Photos

Activity Videos