सामाजिक कार्ये

४ ते ६ फ्रेम मधील बेसिक कॉलिटीसाठी १५.५ पैसे प्रति पिक ही मजूरी ठरविणेत आलेली आहे

गेली ३ ते ४ वर्षे इचलकरंजी व परिसरातील १९० सें.मी. ३०० RPM बरील सर्व शटललेस रॅपिअर कारखानदार नुकसाणीमध्ये व्यवसाय करीत आहेत. अपेक्षीत मजूरी मिळत नाही. दिसेरिवस वीजेचे दर, कामगार पगार, सुटे भाग ल इतर खर्च वाढत आहेत, यामुळे कारखानदार नुकसाणीत जात आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अनेक मिटिंगा घेऊन कांही निर्णयापर्यंत आले आहोत. सर्व शटललेस कारखानदारांनी आज रोजी खालील प्रमाणे निर्णय केलेले आहेत. सर्वांनी एक मताने हे निर्णय घेतलेले आहेत. त्याची घोषणा इचलकरंजी पावरलूम असोशियन येथे केली. आज रोजी झालेले निर्णय खालीलप्रमाणे. .. १) ४ ते ६ फ्रेम मधील बेसिक कॉलिटीसाठी १५.५ पैसे प्रति पिक ही मजूरी ठरविणेत आलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत या ठरलेल्या मजूरीखाली बिमे/सौदे करणार नाही. आणि याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबर २०२० पासून करणेची आहे. २) ६ व त्यावरील फ्रेमच्या कॉलिटीसाठी त्या-त्या कॉलिटीप्रमाने मजुरी वाढवून घेणेची आहे. ३) इचलकरंजीमध्ये मजूरीची पेमॅंटधारा १५ जुलै २०२० पासून ३० दिवस ठरलेली आहे. यामध्ये कोणताही बदल करणार नाही. पेमेंट ३० दिवसांच्यावर घेणार नाही.

Activity Photos

Activity Videos