सामाजिक कार्ये

इचलकरंजी कोल्हापूर रोड येथील व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडीयम स्कूल, कबनूर मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरची पाहणी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी केली.

संकट मोठे आहे, पण प्रयत्न थांबता कामा नये..! इचलकरंजी कोल्हापूर रोड येथील व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडीयम स्कूल, कबनूर मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरची पाहणी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी केली. ६६ बेडच्या या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी ऑक्सीजन सुविधा उपलब्ध असणार आहे. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार व सर्व आवश्यक गोष्टी मिळू शकणार आहेत. यावेळी नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी, आरोग्य सभापती संजय केंगार, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, नगरसेवक सुनिल पाटील, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील , नितीश पोवार, डॉ.चौगुले, डॉ.बडबडे, नगररचनाकार सहाय्यक तेजस इंगळे, सुहास कांबळे, मेहबूब मुजावर आदी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos