सामाजिक कार्ये

यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढ प्रश्नांसंदर्भात कामगार मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या कागल येथील निवासस्थानी भेट घेऊन कामगारांच्या विविध प्रश्नांचे निवेदन

इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांच्या मजुरीवाढ प्रश्नांसंदर्भात आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या कागल येथील निवासस्थानी भेट घेऊन कामगारांच्या विविध प्रश्नांचे निवेदन दिले. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगातील कामगार वर्ग हा कष्टकरी वर्ग आहे. त्यामुळे या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. या मजुरीवाढीचा प्रश्न लवकर सुटावा, यासाठी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः लक्ष घालून यंत्रमागधारक, व्यापारी, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, संबंधित शासकीय अधिकारी व प्रमुख राजकीय मंडळींच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केली. कामगारांचा संघर्ष टाळण्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ त्वरीत स्थापन होणे गरजेचे आहे. मात्र अद्यापही त्या संदर्भात काहीच कार्यवाही झालेली नाही. कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याचे कामकाज त्वरीत सुरु करावे. यासह २७ एचपी वरील व खालील सर्व यंत्रमागधारकांना सबसिडी पूर्वव्रत करावी अशा मागण्यांचे निवेदन दिले. यावर सकारात्मक प्रतिसाद देऊन संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

Activity Photos

Activity Videos