सामाजिक कार्ये

कबनूर नगरपरिषद मागणीस जाहीर पाठींबा

इचलकरंजीच्या नजिक असलेल्या कबनूर गावची लोकसंख्या ५० हजाराहून अधिक आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीला मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मर्यादा येत आहेत. यासाठी ग्रामपंचायतीची नगरपरिषद करण्याची मागणी गेल्या खूप वर्षापासून प्रलंबित आहे. याबद्दल कबनूर सर्वपक्षीय समितीने कबनूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनास प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनास पाठींबा दिला. गावच्या विकासासाठी नगरपरिषद होणे गरजेचे आहे, हा प्रश्न सोडवू शासन दरबारी संदर्भ मांडून लागेल ती मदत करेन असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. याप्रसंगी उपोषण कर्त्यांना शीतपेय पाजून या आंदोलनाची सांगता करण्यात आली. माझ्या शब्दावर हे उपोषण मागे घेण्यात आले, त्याबद्दल सर्व उपोषण कर्त्यांचे आभार..! ही मागणी प्रक्रिया मी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लागेल ती मदत करेन. याप्रसंगी दत्ता शिंदे, उत्तम जाधव, अजित कुडे, युवराज कांबळे, बबलू सनदी, नितीन गवळी आदी उपोषणकर्ते यांच्यासह ज्येष्ठ नेते सुधाकर मणेरे (मामा), सरपंच शोभा पोवार, ग्रा.पं.सदस्य मधुकर मणेरे , ग्रा.पं.सदस्य सुधीर लिगाडे, ग्रा.पं.सदस्या वैशाली कदम, ग्रा.पं. सदस्य सुनिता आडके, ग्रा.पं. सदस्या रजनी गुरव, ग्रा.पं. सदस्या सुधाराणी पाटील, ग्रा.पं. सदस्या रोहिणी स्वामी, दिपक केटकाळे, विकास फडतारे, निलेश पाटील, बबन केटकाळे, नितीन काडाप्पा, मनोहर मणेरे, समीर जमादार, सागर तराटे, संजय कट्टी, रावसाहेब खवरे, अशोक कांबळे, बाळासाहेब कामत, दत्ता पाटील, शकील मुल्ला, मेहबुब मुल्ला, रवी धनगर, कुंदन आवळे, फिरोज फकीर, राजू शिरगुप्पे, शरद कांबळे, सतीश पाटील, जावेद फकीर, प्रवीण शिरगुप्पे, राजू शिरगुप्पे आदींसह सर्व पक्षाचे पदाधिकारी उपोषणकर्ते, कबनूर ग्रामस्थ उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos