सामाजिक कार्ये

कामगार भवन येथे १०० बेडचे कोविड हॉस्पिटल बनले आहे. त्यामध्ये ३० बेड ऑक्सिजनयुक्त आहेत तर व्हेंटिलेटर व आयसीयू देखील उपलब्ध आहे .

आर्ट ऑफ लिव्हिंग" चा मदतीचा हात... महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोल्हापूर हा हॉटस्पॉट जिल्हा बनला आहे. त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी हे शहर कोरोना हॉटस्पॉट दिशेने जात आहे. येथील मृत्युदरही ४.२ अशा दुर्दैवी स्वरूपाचा आहे. या परिस्थतीमध्ये इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटल मधील बेड आणि वैद्यकिय यंत्रणा अपुरी पडत असल्याने कामगार भवन येथे १०० बेडचे कोविड हॉस्पिटल बनले आहे. त्यामध्ये ३० बेड ऑक्सिजनयुक्त आहेत तर व्हेंटिलेटर व आयसीयू देखील उपलब्ध आहे . जीवनातील आनंद कशात आहे व तो कसा जगायचा हा संदेश देणारे श्री श्री रविशंकरजी यांच्या ट्रस्ट ने आज कामगार कल्याण भवन इमारतीस भेट दिली . आर्ट ऑफ लिव्हिंग चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. मुंदडाजी यांच्याशी चर्चा करून त्यांनी आज कामगार कल्याण मंडळ च्या इमारतीस भेट देऊन तेथील सर्व माहिती जाणून घेऊन लवकरच हे कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने चालू करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग ची टीम यांच्या समवेत आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सुनील पाटील, सतीश डाळ्या आदी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos