सामाजिक कार्ये

पंचगंगा वरद विनायक क्लबच्या खेळाडूंचा सत्कार केला व पुढील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.

चंदीगड, पंजाब येथे झालेल्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय कनोइंग आणि कयाकींग स्पर्धेत पंचगंगा वरद विनायक बोट क्लबच्या खेळाडूंनी रौप्य व कास्य अशी ६ पदके प्राप्त केली. या क्लबच्या खेळाडूंनी पंजाब येथील स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे नेतृत्व करीत स्पर्धेमध्ये भरघोस यश प्राप्त केले त्याबद्दल पंचगंगा नदी घाट, इचलकरंजी येथे क्लबच्या खेळाडूंचा सत्कार केला व पुढील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. या दरम्यान पंचगंगा वरद विनायक क्लबच्या खेळाडूंनी कनोइंग आणि कयाकींग या खेळाचे सादरीकरण केले. तसेच याच क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अमोल बरगाले याचाही सत्कार करून त्याचे अभिनंदन केले. भविष्यात या स्पर्धा इचलकरंजी मध्ये व्हाव्या, यासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली. यावेळी बाळासाहेब कलागते, रमेश सातपुते, गणेश बरगाले, डॉ. विजय माळी, सेवा सोसा. चेअरमन शिवाजी काळे, व्हा. चेअरमन राजू मिरजे, माजी चेअरमन शिवाजी माळी यांच्यासह क्लबचे खेळाडू उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos