सामाजिक कार्ये

आयजीएम ३०० बेडचे करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर..

आयजीएम रुग्णालयाचे एनएबीएच आणि एनएबीएल अ‍ॅक्रीडेशननुसार आधुनिकीकरणाचे काम सुरु असून अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असे हे रुग्णालय बनणार आहे. या कामाची पाहणी केली. व पत्रकार बांधवांशी संवाद साधला. राज्यातच नव्हे तर देशात एक नंबरचे रुग्णालय करण्याचा मानस असून ज्या संकल्पेने हे रुग्णालय करावयाचे होते त्यानुसार काम सुरु आहे. या रुग्णालयात एकूण 6 ऑपरेशन थिएटर असणार असून त्यामध्ये न्यूरो, हार्ट, आर्थो, जनरल असे चार थिएटर पहिल्या मजल्यावर तर तळमजल्यावर अपघात आणि प्रसुतीसाठीचे दोन थिएटर असणार आहेत. हे रुग्णालय 300 बेडचे रुग्णालय करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक सौ. सुप्रिया देशमुख यांनी शासनाला पाठविला असून येत्या दोन महिन्यात त्याला मान्यता आणि आवश्यक स्टाफ उपलब्ध करुन देऊ. या पाहणी दरम्यान रुग्णांशी संवाद साधला असता रुग्णांनी रुग्णालयाचे नवे रुप व तेथील सुविधा आणि उपचार याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर 75 बेडचे ट्रामा केअर सेंटर मंजूर असून त्याचीही सुरुवात केल्यानंतर हे रुग्णालय 375 बेडचे होणार आहे. तसेच 24 बेडचे आधुनिक सुविधा व यंत्रणा असलेला अतिदक्षता विभागांसह सेमी आयसीयु अंतर्गत आणखीन 24 बेडची सुविधा असणार आहे. शिवाय लहान मुलांसाठी 8 बेडचा अतिदक्षता विभागासह 40 बेडचा सेमी अतिदक्षता विभाग असणार आहे. दरवर्षी रुग्णालयासाठी 11 कोटी रुपयेप्रमाणे पाच वर्षातील 55 कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले असून त्या रकमेऐवजी रुग्णालयास आवश्यक ते साहित्य देण्यात यावे, अशी मागणी मी शासनाकडे केली आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णाला उपचार नाहीत म्हणून माघारी जावे लागणार नाही. तर डॉक्टर्स, परिचारीका व कर्मचारी यांच्यासाठी असलेले आताचे स्टाफ क्वार्टर्स पूर्णत: पाडून त्याठिकाणी नवीन पध्दतीने फ्लॅट बांधण्यात येणार असून त्यासाठीचे साडेचार कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत. यावेळी डॉ. आशिष घाटगे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील, कार्यालयीन अधिक्षक भारत शिंदे, अविनाश चिले, डॉ. संतोष पोळ, रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. डी. पी. वाडकर, डॉ. महेश महाडीक, सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले शाखा अभियंता सतिश शिंदे, उपअभियंता शिवाजी पाटील, कपिल शेटके, विजय पाटील आदी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos