सामाजिक कार्ये

इचलकरंजी मधील प्रश्नांसंबंधी जिल्हाधिकारी मा.दौलत देसाई व मा.प्रांताधिकारी विकास खरात यांची भेट घेतली .

जिल्हाधिकारी मा.दौलत देसाई व मा. प्रांताधिकारी विकास खरात यांना भेटून इचलकरंजी IGM हॉस्पिटल , इचलकरंजी वारणा पाणी योजना, इचलकरंजी शहरामध्ये 100 व आसपासच्या ग्रामीण भागामध्ये शुद्ध पेयजल प्रकल्प केंद्र उभारणी, इचलकरंजी शहरांमध्ये 107 कोटी या निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामावर एक स्वतंत्र नियंत्रण कमिटी नेमण्यात यावी याबद्दल तसेच पूर व अतिदृष्टीने ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे,त्यांना घर बांधताना साईट मार्जनची अट न लावता जो त्यांच्या घराचा पूर्वीचा पाया आहे, त्या जागेवरचं घर बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून जो निधी मंजूर झाला आहे व होणार आहे,तो त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा, त्याला लागणारी जी कर्जाची रक्कम आहे, ती कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या वतीने त्वरित मंजूर करून देण्यात येईल, त्याशिवाय ज्या नागरिकांना डेंग्यू हा आजार झाला आहे. त्यांना IGM हॉस्पिटलमध्ये पुरेसा उपचार होत नसल्याने अलांयस व निरामय या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या वतीने मोफत उपचार करून देण्यात येईल. तसेच ताराराणी पक्षाच्यावतीने ब्लड डोनेट कॅम्प सुरू करण्यात येणार आहे. अशा अनेक विषयावर चर्चा केली.

Activity Photos

Activity Videos